आज तंत्रज्ञान ही काळाची गरज असून सर्वच क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे. मात्र कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात  होत असलेली प्रगती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला विलंब होतो किंवा शेतकरी त्यापासून वंचित राहतात, त्यामुळे बहुतांशशेतकरी पारंपरिक शेती पद्धतीवर अवलंबून राहतात. वाढत्या महागाई नुसार शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न आणि पुरेसा नफा मिळत नाही. बऱ्याचदा पिकांवरील कीड व रोगांची माहिती नसल्याने शेतकरी चुकीचे आणि अनावश्यक कीटनाशक व खते वापरतात. त्यामुळे वायफळ खर्च होतो सोबतच पिकाला हानी होण्याचीही शक्यता असते. पिकांचे रोजचे अचूक भाव माहित नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची योग्य ती किंमत मिळत नाही.

सर्व गोष्टी लक्षात घेऊन नागपूर येथील श्री. सचिन फरफड पाटील, हेमंत वसंतराव कोंडे, रमशा शेख, निशांत बुरनासे आणि पराग बागडे यांनी ‘स्मार्ट यू कृषी खाता’ या स्टार्टअप ची स्थापना केली. स्मार्ट यू कृषी खाता हे एक ‘आर्टिफिशिअल इंटेलिजनस’ वर आधारित शेतीविषयक ‘व्हॉट्सॲप’ ॲप्लिकेशन आहे. मराठी भाषेमध्ये असल्यामुळे वापरण्यास सोपे असून तसेच शेतकऱ्यांसाठी पूर्णतः निशुल्क उपलब्ध आहे.

स्मार्ट यू कृषी खाता ने शेतकऱ्यांना विविध शेतोपयोगी सेवा उपलब्ध करून दिल्या आहे.

  • ‘स्मार्ट यू कृषी खाता’ ज्यामुळे शेतकरी शेतीत होणारे खर्च आणि उत्पन्नाची नोंद तसेच हिशोब ‘व्हॉट्सॲप’ वरच ठेऊ शकतात.
  • कृषी क्लिनिक’ ज्यात शेतकऱ्याला पिकांवरील कीटक आणि रोगांची माहिती देऊन कृषी तज्ञांद्वारे त्यावर उपाय योजना सुचवल्या जातात. शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केल्या जाते.
  • ‘कृषी माहिती’ मध्ये नवनवीन शेती पद्धती तसेच शेतीसाठी उपयोगी योजना यांची माहिती मिळते त्याचा उपयोग सर्व शेतकरी आपल्या शेतात करुन आपले उत्पन्न वाढवु शकतात. ‘शेतमाल बाजारभाव’ या सेवेद्वारे शेतकरी शेत मालाचा बाजार भाव आपल्या ‘व्हॉट्सॲप’ वर बघू शकतात.

 

‘स्मार्ट यू कृषी खाता’ हे कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, अग्रेसर स्टार्टअप आहे. भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या लक्ष्यात घेऊन स्मार्ट यू ने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ‘न्याच्युरल ल्यांग्वेज प्रोसेसिंग’ या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतीय शेतकऱ्यांसाठी ‘व्हॉट्स ॲप ‘ वर मराठीमध्ये चालणारे, एक शेतोपयोगी साधन विकसित केले आहे. ‘स्मार्ट यू’ कृषी आधारित उद्योगांना शेतकऱ्यांशी जोडण्यास मदत करतो. ‘स्मार्ट यू’ हे नवीन स्टार्ट अप असूनही गेल्या वर्षभरात चाळीस हजाराहून अधिक शेतकरी याचा उपयोग करुन नफा मिळवत आहेत. ‘स्मार्ट यू कृषी खाता’ येत्या काळात शेतकऱ्यांना फायदेशीर अश्या आणखी सेवा  लवकरच घेऊन येत आहे.

‘स्मार्ट यू’  हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये वापरण्याकरिता 7887412712 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि WhatsApp वर START मेसेज पाठवा किंवा https://wa.me/message/I7V33Q4S6XBZC1 या लिंक वर क्लिक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Start Using SmartU?